अजगर Indian Rock
Python (python molerus molerus)
आपणास सर्वश्रुत असलेले पिलांना जन्म देणारे
अनाकोंडा हे पानअजगर मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळतात. त्याच प्रमाणे अजगर हा संपूर्ण भारतात आढळणारा
सर्वांत मोठा
बिनविषारी सर्प आहे. पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. अजगराला ‘इंडियन रॉक पायाथोन’ म्हणून ओळखले जाते.
खडकाळ जमिनी व घनदाट वनात झाडावर वावरतात. भारतात आढळणारा पायथॉन रेटिक्युलेटस हा अजगर १० मीटर
पर्यंत लांब व घेर २५
सेंमी. असतो. अजगराचा
रंग पाठीवर मातकट फिक्कट असतो. व त्यावर गडद तपकिरी रंगांचे पट्टे व ठिपके असतात.
त्वचा गुळगुळीत असून त्यावर चमकदार खवले असतात. उभ्या बाहुल्या असलेले डोळे पिवळे
असतात. प्रौढ अजगराच्या गुदद्वाराजवळ घटलेल्या हाडांचे पाय दिसून येतात. त्याला
नखेसुद्धा स्पष्टपणे पहावयास मिळतात.
अंधारात भक्ष पकडण्यात तरबेज असतो. त्याच्या
वरच्या ओठांच्या खाचामध्ये उष्णतेला संवेदनशील भाग असतो. त्यामुळे हवेत गारवा असला
तरी उष्ण रक्ताचे उंदरासारखे प्राणी चपळाईने पकडतो भक्ष्याच्या शरीराभोवती वेटोळे
घालून घट्ट आवळतो. त्यामुळे भक्षाला हालचाल करणे मुश्कील होते व भक्ष गुदमरून
मरते. अजगरच्या जबड्याला अस्तीबंधानी जोडलेली लवचिक हाडे असतात. त्यामुळे त्याच्या
शरीराच्या आकारमानापेक्षा मोठे भक्ष तो गिळकृत करू शकतो. भक्ष गिळण्याची त्याची
विशिष्ट पद्धत असून आपले भक्ष डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो. त्यामुळे
भक्षाचे पाय किंवा शिंगे यांचा त्याला गिळताना अडसर होत नाही. अजगराची पचनशक्ती
प्रचंड असते त्यामुळे त्याच्या पोटात भक्ष्याची हाडे सहजपणे पचवली जातात. त्याच्या
विष्ठेत खालेल्या प्राण्याचे केस, शिंगे अथवा पंख न पचता दिसून येतात. एखाद्या
मोठ्या जनावराला भक्ष्य केल्यानंतर अजगराला श महिन्यापर्यंत अन्नाची गरज भासत
नाही.
अजगराचा विणीचा हंगाम जानेवारी ते मार्च असतो.
मिलनानंतर मादी साधारणता तीन महिन्यांनी १० ते १०० पर्यंत अंडी घालते. अजगराची
मादी अंड्यातून पिले बाहेर येई पर्यंत अंड्यासोबत राहून त्यांचे रक्षण करते व
आवशकते नुसार आपल्या शरीराचे आकुंचन व प्रसरण करून अंडी उबवण्याचे काम करते.
जगभरात सापांची मोठ्या प्रमाणावर शिकार व तस्करी
केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात सापाच्या कातड्याला खूप मागणी असते. सापाच्या
कातडीपासून पट्टे, पर्स व शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. त्यामुळेच अजगराची शिकार
व तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते. भारतात वन्यजीव कायद्याअंतर्गत जागर पाळणे
किंवा सापांची कातडी बाळगणे बंदी करण्यात आली आहे. असे करणाऱ्याला तुरुंगवासाची
शिक्षा व दंड आकारण्यात येतो.
No comments:
Post a Comment