मित्रहो सापांचे जग हे नेहमीच कुतूहल आणि आश्चर्याने भरलेला आहे. आपण त्याबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. अनाकोंडा सारख्या 30 ते 40 फूट लांबीचा साप पासून ते 10 ते 15 सेंटिमीटर लंबीचा वाळा जातीचा साप संपूर्ण जगभरात सापडतो.
आज आपण वाळा जातीचा साप याबद्दल माहिती जाणून घेणार आहे आपल्याला माहिती आहे की लहान मुलाचे पाया मध्ये एक तांब्याचं आभूषण घातले जात. त्याला आपण वाळा असं म्हणतो. अगदी तशाच प्रकारचा रंग असल्यामुळे आणि जाडी तशी असल्यामुळे त्याला भारतामध्ये वाळा साप म्हणतात.
इंग्रजीमध्ये त्याला worm snake किंवा thread snake असे संबोधले जाते. रंग काळा किंवा तांबूस तपकिरी असतो. आणि हा भारतातील सर्वात लहान साप म्हणून ओळखले जाते. या सापाची त्वचा अतिशय चमकदार असते आणि तो गांडूळ सारखा भासतो त्याच्या त्वचेवर गुळगुळीत चमकदार खवले असतात. त्याचबरोबर त्याचे डोके आणि तोंड शेपूट दिसायला एकसारखेच असते. त्यामुळे आपल्याला त्याची पुढची किंवा मागची बाजू सहजपणे ओळखता येत नाही. या सापाचे डोळे खूप लहान असतात. त्यामुळे त्याला आंधळा साप असे समजले जाते. सापाच्या पुढच्या बाजूला टाकदार असतो. त्याच्या वापर करून तो स्वतःचे बीळ तयार करत असतो किंवा त्याच्या शत्रूपासून सुटका करण्यासाठी करत असतो. सर्वात महत्वाची विशेष गोष्ट म्हणजे वाळा जातीच्या सापांमध्ये नर साप नसतो. तर त्या सर्व मादी असतात. आणि त्यामुळेच मिलना शिवाय हा साप सहा ते सात अंडी घालतो आणि त्यातूनच पुढे पिलांचा जन्म होतो. या सापाची छोटीशी जीभ सतत आत-बाहेर करत असते. त्याचे बारकाईने पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येईल. हा साप पावसाळ्यात आपल्या अंगणामध्ये पाहायला मिळतो पालापाचोळ्यात आश्रय घेणारा हा छोटा साप भारतातील सर्वात छोटा साप समजला जातो जगभरामध्ये साधारणतः 13 ते 14 प्रजाती आढळतात.

