Monday, November 25, 2019

तस्कर साप Common Trinket Snake



तस्कर Common Trinket Snake (Elaphe helena)
तस्कर साप हा अत्यंत निरुपद्रवी बिनविषारी साप आहे.  हा साप जम्मू काश्मीर आणि उत्तर-पूर्व भारत सोडून श्रीलंकेसह संपूर्ण भारतात सापडतो. अतिशय शांत स्वभावाचा साप आहे. तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. याची लांबी साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असते  व जाडी १ इंचापर्यंत असू शकते.  अंगावर पट्टे असतात छोट्या काळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेले असतात.  हा साप मुखत्वे उंदीर, पाली सरडे बेडूक, पक्षांची अंडी इत्यादी खाद्य खातो.






गवत्या साप (Green Keel back )


गवत्या (Green Keel back )
शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर

गवत्या हा एक बिनविषारी साप असून समुद्र सपाटीपासून ७०० ते २००० मी. उंचीपर्यंत आढळतो.
हा साप डोंगराळ भागात आढळणारा असून डोंगर लगतच्या सपाट प्रदेशात ही तो वावरताना दिसतो. गवत्या हा साप चपळ असून दिवसा हिंडणारा निरुपद्रवी साप आहे. गवतामध्ये व झुडपात आडोसा घेतो. गत्य सापाची मादी नर पेक्षा लांब असून लांबी ९० सेमी असते., तर नराची लांबी ६० सेमी. या सापाचा रंग गवतासारखा हिरवा असून त्यावर काळे किंवा पांढरे ठिपके असतात. खवल्याच्या मध्यभागी उंचवटे असून खरखरीत असतात. खवल्यांचा रंग खालच्या बाजूने पांढरा असून दोन्ही बाजूला पिवळ्या रेषा असतात. डोळ्यांच्या मागे एक काळी रेषा असते. हिरव्या रंगामुळे हा साप झाडा-झुडपात सहजपणे ओळखता येत नाही.  बेडूक, लहान पक्षी, गोगलगाई हे त्याचे खाद्य असून फेब्रुवारी ते मार्च हा मिलन काळ असून मादी दर खेपेला ७ ते १२ अंडी घालते.
बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मीलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिल्ले जन्मतात.